Bhor News l 'ध्रुव'चे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद : प्रांताधिकारी डॉ. विकास खरात

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात अनेक वर्षांपासून गोरगरीब तसेच वंचितांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणारे एकमेव ध्रुव प्रतिष्ठान असून ध्रुवच्या माध्यमातून भरीव सामाज हिताचे कार्य केले जात आहे.त्यातल्यात्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झगडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे तसेच शिष्यवृत्ती देण्यात कायमच पुढाकार असल्याने ध्रुव प्रतिष्ठाच्या सामाजिक उपक्रमांना सलाम असे मत प्रांताधिकारी डॉ.विकास खरात यांनी व्यक्त केले.
     ध्रुव प्रतिष्ठान टीटेघर ता.भोरच्या माध्यमातून एक वंचित शिक्षण व समाज विकास प्रकल्प अंतर्गत विसगाव ,चाळीसगाव खोऱ्यातील शेकडो शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तर साक्षी खाटपे,ऋतुजा सणस यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी डॉ.खरात गुरुवार दि.२६ बोलत होते.यावेळी तहसीलदार राजेंद्र नजन, बिडोओ किरणकुमार धनवाडे,उदय जाधव,सुषमा पाटील,अंजना वाडकर,प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू केळकर,डी.एम.कंक,सीए प्रसाद चव्हाण,सुदाम ओंबळे,पंडित गोळे,प्रा.संतोष घोरपडे,जयवंत थोपटे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमप्रसंगी दोन वर्षाच्या राजवर्धिनी चव्हाण या चिमुकलीने कळसुबाई शिखर पार केल्याने हीचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Tags
To Top