Baramati News l टेम्पो-दुचाकीच्या अपघातात वाणेवाडी येथील ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू : निरा-बारामती रस्त्यावरील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मालवाहू टेम्पोचा रॉड तुटल्याने टेम्पोने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात एका दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. 
         ही घटना निरा बारामती रस्त्यावर सोरटेवाडी गावाच्या हद्दीत दि. ४ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये तय्यब रमजान शेख वय ३२ वर्षे रा. वाणेवाडी ता. बारामती याचा मृत्यू झाला आहे. 
     टेम्पो चालक संजय बाळासो जगताप  रा मुढाळे ता. बारामती जि.पुणे हे चार चाकी मालवाहतुक टेंम्पो नं.एम.एच. 42 एक्यु 3760  हा बारामती निरा रस्त्याने निरा बाजूकडून बारामती बाजूकडे चालले असताना टेम्पोचा रॉड तुटून टेंम्पो राँग साईटला जावुन रोडने  बारामती बाजूकडून निरा बाजूकडे जाणारा मोटार  सायकल क्र. एम.एच 42 एक्स 4575 या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकल वरील  तय्यब रमजान शेख वय 32 वर्षे रा. वाणेवाडी ता. बारामती यांना गंभीर दुखापत झाली यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.  
पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.
To Top