Pune News l सोन्याच्या दुकानातून कर्मचारीच चोरायचा सोन्याच्या वस्तू : साडेचार कोटींना घातला सराफी पेढीला गंडा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
सेल्समनने सोन्याची चोरी करुन सराफी पेढीला घातला तब्बल 4 कोटी 58 लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नीलकंठ ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. 
        विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला अटक केली आहे. दोन महिन्यात सेल्समनने सराफी दुकानातील अंगठी, कॉइन, वेडणी असे तब्बल 4 कोटी 58 लाख 13 हजार 679 रुपयांचे सोने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत नितीन इरप्पा डांगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्रतिक नगरकर याला अटक करण्यात आली आहे.
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हा नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानात कामाला होता. त्याच्याकडे सराफी पेढी मधील अंगठी, कॉइन व वेडणी या काउंटरची जबाबदारी होती. दररोज, तो तिथल्या दागिन्यांचे लेबल काढून ठेऊन तिथेच ठेवत होता. विक्री झालेल्या वस्तू व शिल्लक वस्तू यांची नोंद ठेवताना तो चोरुन नेलेल्या वस्तूंचा शिल्लक वस्तूमध्ये दाखवत होता यामुळे दुकानात हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र, 26 मे रोजी स्टॉक तपासणी करताना नितीन डांगे यांना संशय आला. त्यांनी सर्व स्टॉक मोजून पाहिला तर त्यात तब्बल 4 कोटी 58 लाख 13 हजार 679 किमतीच्या वस्तू गायब असल्याचे समोर आलं. पोलिसांनी आता प्रतीक नगरकर याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.
To Top