Bhor News l संतोष म्हस्के l आजपासून शाळांमधून चिमुकल्यांचा किलबिलाट...! भोरला १४ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
उन्हाळी सुट्टी संपताच १६ जूनला शाळांचा प्रारंभ होताच चिमुकल्यांचा शाळेत पहिल्या दिवशी कीलिकीलाट होणार असून विद्यार्थ्यांनी शाळा गजबजणार आहेत.भोर तालुक्यातील २४ केंद्रांमधील २९८ शाळांच्या पहिली ते पाचवी ८ हजार ३१८ तर सहावी ते आठवी  ५ हजार ६३८ असे एकूण १३ हजार ९५६ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके,गणवेश,बूट,सॉक्स वाटप होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली.
      तळागाळातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला महत्त्व देत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश देण्याचे नियोजन केले.त्याप्रमाणेच शाळेच्या पहिल्याच दिवशी एकही विद्यार्थी गैरहजर राहू नये. शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढावी.या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.तर चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वाजत गाजत शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.तर गुलाब पुष्प देऊन तसेच गोड खाऊ देत नवागतांचे स्वागत केले जाणार आहे.भोरला येवली केंद्रावर तालुक्यातील २४ केंद्रांची पाठ्यपुस्तके केंद्रप्रमुख व शिक्षकांकडे सुपूर्त करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांच्या केंद्रशाळांवर २९८ शाळांची पाठ्यपुस्तके देण्यात आली.पंचायत समिती समन्वयक प्रभावती कोठावळे यांनी पाठ्यपुस्तके वाटपाचे नियोजन केले होते.केंद्रातील शाळांच्या शिक्षकांकडे १५ जूनला पाठ्यपुस्तके देण्यात आली असून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.असे शिक्षक नेते बापू जेधे यांनी सांगितले.


Tags
To Top