सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील चौपाटी येथे एका दांपत्यास अनोळखी व्यक्तींनी मारहाण करीत हल्ला केल्याची घटना शनिवार दि. १४ रात्री १० च्या सुमारास घडली.याबाबत आनंद शाहू चव्हाण (वय ३५ वर्ष, सद्या रा.कोंढवा पुणे ,मुळगाव खानापूर ता.भोर) यांनी भोर पोलीसात ६ आज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आनंद चव्हाण आपल्या पत्नी पूजासोबत भोर चौपाटीवरील ‘हॉटेल रुचिरा’ समोर उभे असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला.यावेळी तिथे उभ्या असलेल्या सहा अनोळखी इसमांनी वादात नाक खुपसून चव्हाण यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.तर तु आम्हाला जाण्यास सांगणार कोण असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यावेळी पत्नीने मध्ये पडून पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिलाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. या घटनेत आनंद चव्हाण यांनी एटीएममधून नुकतेच काढलेले १० हजार पडले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अतुल मोरे यांच्याकडून आरोपींचा शोध सुरू आहे.