Bhor News l भोर तालुक्यात धुव्वादार...! ओढ्या-नाल्यांना पूर : नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
तीन दिवसांपासून संततदार सुरू- पावसाचा हाहाकार 
भोर तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततदार सुरू असल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. शेती कामे रखडली असून
खरिपातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकांची पेरणी रखडली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
           मान्सूनच्या पावसाने यंदा वेळेवर हजेरी लावली असल्याने तालुक्यात सर्वदूर चार दिवसांपासून सलग जोरदार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ओढ्या नाल्यांना पूर आला आहे.सध्या तालुक्यात सर्वत्र पूर परिस्थिती असून जोरदार वारे व अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील शेती पिकांची पेरणी रखडली असल्याने नागरिक हवालदिन झाले आहेत.पुढील काळात असाच जोरदार पाऊस सुरू राहिला तर तालुक्यावर ओला दुष्काळ उडवण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.सध्या नीरा नदीपात्रात त पाण्याची मोठी वाढ झाली असून रामबाग ओढा तसेच गावोगावच्या मोठमोठ्या ओढ्यांना पूर आला असल्याची परिस्थिती आहे.तालुक्यात सध्या अतिवृष्टी सुरू आहे तालुक्यातील नागरिकांनी अतिवृष्टीत घराबाहेर पडू नये तर सावधानता बाळगावी असे आवाहन भोर प्रांताधिकारी डॉ.विकास खरात तसेच तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे.
Tags
To Top