Bhor News l भोर आगाराच्या ताफ्यात नवीन पाच लालपरी दाखल : आजी-माजी आमदारदारांकडून श्रेयवाद...दोनदा लोकार्पण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय पाहता राज्य शासनाकडून पाच नवीन एसटी बसेस भोर आगारासाठी देण्यात आल्या. या पाच लालपरींचे लोकार्पण माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सकाळी आठच्या दरम्यान तर काही वेळाने विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी बस स्थानकात केले. पाच बसेसचे आजी-माजी आमदार यांच्याकडून दोन वेळा लोकार्पण पार पडल्याने राजकीय चर्चांना मोठे उधान आले असून लोकार्पण सोहळ्यात श्रेयवाद दिसून आला.
                दुर्गम डोंगरी भोरच्या नागरिकांची दळणवळणाची एसटी बसेस अभावी गैरसोय होत होती.राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याने भोर आगारात ५ दाखल झाल्या.यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची गैरसोय थांबणार आहे.तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे भोर आगारासाठी नवीन एसटी बसेसची मागणी केली होती.त्याप्रमाणे ५ बस देण्यात आल्या असे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.तर भोर, वेल्हा ,मुळशी मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २५ बस देण्यात याव्यात याची मागणी केली होती.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही दुर्गम डोंगरी तालुक्यासाठी एसटी बसेससाठी मागणी करून पाठपुरावा केला.पहिल्या टप्प्यात पाच बस एसटी आगारासाठी देण्यात आल्या आहेत.दुसऱ्या टप्प्यात अजूनही बस मिळणार आहेत.मिळालेल्या पाच बसेसचे लोकार्पण भोर आगारात करण्यात आले असे आहे असे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,संतोष घोरपडे,चंद्रकांत बाठे,अतुल काकडे,जीवन कोंडे,अमर बुदगुडे, विठ्ठल आवाळे, राजाभाऊ गुरव,उत्तम थोपटे,अमित सागळे,बंडूशेठ गुजराती,ऍड.विश्वनाथ रोमन, आगार व्यवस्थापक रमेश मंता,प्रदीप इंगवले,दत्तात्रेय गावडे,संभाजी पाटणे आदींसह भाजपा तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
To Top