जबाबदारीचे भान असलेला कुशल प्रशासक व सकारात्मक भूमिका घेणारे व्यक्तिमत्व : बी.एन.पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
रयत शिक्षण संस्थेमध्ये जो व्यक्ती प्रामाणिकपणे माझं म्हणून काम करतो. समोरच्या व्यक्तीची व्यथा जाणून घेतो. त्या पद्धतीने त्याला मदत व सहकार्य करीत असेल तर त्याच्या तब्येतीला काहीही होणार नाही. त्या व्यक्तीच्या वाट्याला सुख, समाधान आणि शांती निश्चित लाभल्याशिवाय राहणार नाही.
       अशा व्यक्तींना निरोगी दीर्घायुष्य निश्चितपणे मिळते.
एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस कसा साजरा होतो. याचा विचार करीत असताना लक्षात आले की, एक माणूस बारामतीचा आहे. नोकरी करतो अण्णासाहेब कल्याणी विद्यालय साताऱ्यामध्ये आणि या माणसाच्या वाढदिवसाला बारामती, राहाता, शिर्डी, श्रीरामपूर व नवी मुंबई येथून रयत सेवक येतात. आणि एक कौटुंबिक अत्यंत हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करतात. ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. असे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोकराव भोईटे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. 
अत्यंत हुशार, शांत, संयमी आणि कुशल प्रशासक म्हणून ज्यांची ओळख आहे.
      असे रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव- श्री. बी. एन. पवार  यांच्या ५६ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वर नगर व अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील ५६ शाळांना ५६० पुस्तके मान्यवरांच्या शुभहस्ते भेट देण्यात आली. 
       याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे सहसचिव- (ऑडिट विभाग), प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे सहसचिव- (उच्च शिक्षण), संभाजीराव काकडे, प्रा. हनुमंत माने, निखिल गायकवाड, प्रा.श्याम जगताप इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे , संभाजीराव काकडे, प्रा. हनुमंत माने इ. मान्यवरांनी अभ्यासपूर्ण मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक- एस. ए. बोधे यांनी केले. सूत्रसंचालन- माधुरी जाधव व वासंती जाधव व आभार एस. डी. घोरपडे यांनी मानले.
Tags
To Top