Baramati News l बारामती-फलटण रस्त्यावर दुचाकीस्वाराला लुटत मोबाईलसह १८ हजारांची रोकड लांबवली : माळेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात चोरट्यांना केले जेरबंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बारामती-फलटण रस्त्यावर पाहुणेवाडी गावाच्या हद्दीत एका दुचाकीस्वाराला अडवून त्यांचाकडून मोबाईल व १८ हजारांची रोकड लुटणाऱ्या दोघांना माळेगाव पोलिसांनी काही तासात जेरबंद केले आहे. 
           याबाबत भीमराव रामचंद्र पिंगळे यांनी माळेगाव पोलीसात तक्रार दाखल केली आहे. माळेगाव पोलिसांनी चोरट्यांचा माग घेत त्यांना अटक केली आहे. अक्षय चंद्रकांत जाधव रा. खंडाज ता. बारामती व मनोज शिवराज गालफाडे रा. पाहुणेवाडी ता. बारामती यांना अटक केली आहे. 
         याबाबत सविस्तर हकीकत अशी, दि. ३ जून रोजी भिमराव रामचंद्र पिंगळे रा. पिंगळेवस्ती शिरष्णे ता. बारामती जि.पुणे हे आपल्या मोटारसाकल वरून पाहुणेवाडी गावच्या हद्दीत फलटण बारामती रोडने घरी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचे ताब्यातील मोटार सायकल आडवी मारून फिर्यादीस मारहान करून त्यांचाकडून विवो कंपनीचा मोबाईल व खिशातील रोख रक्कम १८ हजार जबरीने चोरी केले.  माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे व गुन्हे पथकाने गुप्त माहीतीदारामार्फत माहिती काढून, तांत्रिक माहीतीचे आधारावर  अक्षय चंद्रकांत जाधव वय.२४ वर्षे रा. खांडज ता. बारामती जि.पुणे व मनोज उर्फ बाबु शिवराज गालफाडे वय १९ वर्षे रा. बुरूडगल्ली पाहुणेवाडी ता. बारामती जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरची जबरी चोरी केल्याचे कबुल केले.  
       सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक देविदास साळवे, पो. हवालदार. राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राउत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, जयसिंग कचरे, अमोल वाघमारे यांनी केली आहे.
To Top