सुपे परगणा l नारोळीच्या सरपंचपदी बाळासाहेब गोसावी बिनविरोध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील नारोळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाळासाहेब (प्रदीप) राजेंद्र गिरीगोसावी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. 
          यापुर्वीच्या सरपंच मोनाली भंडलकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी गिरीगोसावी यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच. आर. मनाले यांनी काम पाहिले. यावेळी गाव कामगार तलाठी अनिता धापटे व ग्रामसेविका रुपाली धायगुडे उपस्थित होते. 
        याप्रसंगी माजी सभापती संजय पोमण, माजी सरपंच दशरथ ढमे, उद्योजक किरण कोंडे, माजी पोलीस पाटील चंद्रकांत गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत ढमे, समीर शेख, शरद वाबळे, सुनील खोरे, भगवान ढमे, अमर ढमे, बबन ढमे, संदीप भंडलकर, आशिष ढमे, संदीप ढमे, पांडूरंग पानसरे, पांडूरंग ढमे, विजय ढमे, शशिकांत गोसावी, शब्बीर इनामदार, सोमनाथ भंडलकर, शंकर भंडलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
              ......................
To Top