सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
जुन २०२४ मध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या बलत्कार प्रकरणातील आरोपीस आश्रय देणारा फरारी आरोपी कुणाल जगदिश कांबळे वय २१ वर्षे, रा.कुमठे ता. तासगांव, जि. सांगली यास मेढा पोलीसांनी सांगली जिल्हयातून अटक केली. आरोपी कुणाल कांबळे हा गत एक वर्षापासून फरारी होता.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ८ जुन २०२४ रोजी रजि.नं. ९६/२०२४ भा.दं.वि.सं.कलम ३७६ (२) (एन), ३७६ (३,) ३६६,३४ सह बाल. लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,६,८,१२ प्रमाणे मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी कुणाल कांबळे याने गुन्हातील आरोपी व अल्पवयीन मुलीस आश्रय दिला होता. त्यामुळे कुणाल कांबळे याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुणाल हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीसांना गुंगारा देत फरारी होता.
मेढा पोलीसांना मिळलेल्या माहितीनुसार सपोनि सुधीर पाटील यांनी पथकाद्वारे आरोपीस अटक कुमठे ता. तासगाव येथुन अटक केली. सदर कारवाई मध्ये मा. श्री. तुषार दोषी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर पाटील सहा. पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे व पोलीस उप-निरीक्षक गंगावणे, पो.ना. बेसके ब.नं.२६८४, पो.कॉ. काळे ब.नं.२५२६, पो.कॉ. वाघमळे ब.नं.१२२८, पो.कॉ. मोरे ब.नं. १२६३ यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे.