सोमेश्वर रिपोर्टर टीम------
धाराशिव : प्रतिनिधी
शिर्डीवरून दर्शन घेऊन घरी परत जाताना कारला अचानक आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन जण या अपघातातून बचावले आहेत.
या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघे जण सुखरूप बचावले आहेत. उमरगा - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबका गावाजवळ ही घटना घडली. उमरगा पोलीस घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. एक जण मयत झाला, तर दोघेजण वाचल्यामुळे घातापाताचा पोलिसांना संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेतून वाचलेल्या दोन्ही व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संशय बळावला आहे. कारला आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाला तर गाडीतील इतर दोघेजण सुखरूप वाचले. शिर्डी येथे साई बाबाचे दर्शन करून हैदराबादला परत जात असताना घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मयत व्यक्ती हैदराबाद येथील शिक्षक असल्याचं समोर आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिनुसार, हैदराबाहून तीन जण शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर तीघंही हैदरबादकडे परत निघाले होते. दरम्यान उमरगा -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबका गावाजवळ असताना कारने अचानक पेट घेतला. काही समजण्याच्या आत संपूर्ण कारने पेट घेतला. यात दोन जण कसेतरी कारमधून बाहेर पडले मात्र एकाला बाहेर पडता आलं नाही. त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस ठाण्याचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. दरम्यान यातून बचावलेल्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.