Kolhapur News l चंद्रकांत भाट l जुन्या वादातून तरुणावर कोयता आणि दगडाने हल्ला करत खून : शिरोळ पोलिसांनी केली सात जणांना अटक

Admin
3 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : चंद्रकांत भाट
जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे (सर्व रा.  शिरोळ) या सात जणांनी संगनमताने दगड आणि कोयत्याने हल्ला करून दीपक दशरथ मगदूम (वय २० वर्षे रा. शिवाजीनगर शिरोळ) यास गंभीर जखमी केल्याची फिर्याद अमोल संतोष सावंत यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान उपचार सुरू असताना दीपक मगदूम याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद झाला .पोलिसांनी सातही संशयितांना अटक केली आहे.
       शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की. परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे आणि दीपक मगदूम यांच्या कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले होते. या जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेज शेख याने दीपक मगदूम यास रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाडला बाई करायला जायचं आहे. असे सांगून मोटरसायकलवरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील तीन तिकटीजवळील शेताजवळ आले. यावेळी परवेज शेख याने हातात दगड घेऊन मारा रे याला म्हणून दीपक मगदूम याच्या डोक्यात पाठीमागून मारले. यावेळी अमोल सावंत याने परवेज शेख यास बाजूला केले असता शेख याने अमोल सावंत यांची गळपट धरून हाताने मारहाण करत तुला पण मारीन अशी धमकी दिली. त्या ठिकाणी अगोदरच शेतात बसलेले रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील प्रतीक सावंत, विनायक साळुंखे हे त्या ठिकाणी आले. यावेळी प्रज्योत साळोखे यांने अमोल सावंत याचा गळा दाबून तू यामध्ये येऊ नकोस असे म्हणत त्याला बाजूला  ओढू लागला. यावेळी संशयित आरोपी परवेज शेख, ऋषिकेश कांबळे, रोहन कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे या सर्वांनी मिळून दीपक मगदूम यास ओढून घेऊन शेतात नेऊन त्याला दगडाने मारहाण केली. याच दरम्यान रोहन कांबळे यांनी कोयत्याने दीपक मगदूम यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केली. यावेळी सर्वजण त्या ठिकाणाहून जात असताना रोहन कांबळे याने आपल्याजवळील कोयता अमोल सावंत यास दाखवून तुला पण जिवंत सोडणार नाही, तुला नंतर बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर सर्व संशयित आरोपीनी घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान या घटनेची रात्री पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांनी जखमी दीपक मगदूम यास तात्काळ मिरज येथील येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्रीपासूनच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला. सोमवारी सकाळी पोलीस उपाधीक्षक डॉ रोहिणी सोळंके यांनीही घटनास्थळी भेट दिली. उपचारादरम्यान सोमवारी दीपक मगदूम याचा मृत्यू झाला.
 शिरोळ पोलीस ठाण्यात परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे , या सात जणांनी संगणमताने दीपक मगदूम याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर या करित आहेत.
To Top