सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर -कापूरहोळ मार्गावरील संगमनेर- माळवाडी ता.भोर जवळील कॉर्नरला समोरासमोर व्यागनार चारचाकी तसेच दुचाकी गाडीचा टक्कर होऊन आळंदी ता. भोर येथील एका तरुणाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.१० रोजी घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तेलवडी ता.भोर येथील वॅग्नर ( एम एच १२ एलजे ०५६१) चारचाकी गाडी भोर बाजूकडे जात असताना कापूरहोळ बाजूकडे जाणारी आळंदे ता.भोर येथील दुचाकी (एमएच १२ पी एक्स ९९७९) दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन आळंदेतील दुचाकी वरील शुभम राजेंद्र पवार या तरुणाचा मृत्यू झाला.तर दुचाकी वरील दुसरा तरुण कुणाल पोपट खोपडे गंभीर जखमी असून भोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तर व्यागणार कार मधील एक जण जखमी असल्याचे सांगण्यात आले.राजगड पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.