Baramati News l कॅम्प कोला कंपनीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुक : सुपेतील व्यापाऱ्याला तब्बल चार लाखांचा गंडा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील व्यवसायकाला रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डिलरशिप मिळवुन देण्याच्या नावाखाली सुमारे चार लाखाला गंडा घातल्याची घटना घडली आहे. 
        मिळालेल्या माहितीनुसार वैभव नवनाथ चांदगुडे ( रा. खोपवाडी, सुपे, ता. बारामती ) यांनी या संदर्भात सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. मागिल महिण्यात वैभव याला एका व्यक्तीचा फोन आला. कॅम्प कोला कंपनीच्या डीलरशिपचे काम द्यायचे आहे. त्यानंतर त्यांनी कंपनीचे एग्रीमेंट केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला येऊन व्हिजिट करेल असे सांगण्यात आले. त्यामुळे मी एग्रीमेंटसाठी तयार होवुन ४९ हजार ५०० रुपये गुगल पे वर पाठवले. तसेच त्यांच्याशी संपर्क करुन एग्रीमेंट पुर्ण केले असुन आपली टीम भेटीसाठी कधी येणार असे बोललो. त्यावेळी त्यांनी मला कोल्ड्रिंकचे अर्धे पेमेंट केल्यानंतर आमची कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला भेट देईन असे सांगितले. त्यामुळे त्यांनी माझ्याकडून कोल्ड्रिंकची ऑर्डर बिल म्हणुन ५ लाख १० हजार रुपये झाले आहेत अर्धी रक्कम भारा असे सांगितले. तुमचे अर्धे पेमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे २४ तासात आमची टीम भेट देईन असे सांगण्यात आले. त्यानुसार बॅंकेकडुन कर्ज काढले. त्यानंतर जीएसटीचे १८ टक्के म्हणजे ९० हजार १९० रुपये रक्कम पाठवली. त्यानंतर २ लाख ५० हजार असे मिळुन ३ लाख ८९ हजार ६९० ऐवढी रक्कम पाठवली. त्यावेळी ते  भेटायला येतो असे सांगितले पण आलेच नाहीत. त्यानंतर चौकशी केली असता हे सर्व  फ्रॉड असल्याचे लक्षात आले. मात्र त्यांनी मला सुमारे ४ लाखाला गंड घातल्याचे लक्षात आले. याबाबत पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे वैभव यांनी सांगितले. 
           ....................................
To Top