सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथे जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बाजार तळावरील स्वच्छता मोहिमेसह शाळा क्रमांक दोन येथे वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली.
सुपे ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ सुपे, मयुरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा, अर्जुना सायन्स एकॅडमी, मयुरेश्वर अभयारण्य स्टाफ, व्यवस्थापन समिती जि.प.शाळा सुपे नं २, येथील आरोग्य विभाग, जेष्ठ नागरिक संघ आदींसह ग्रामस्थ सहभागी होवुन बाजार मैदान परिसराची तसेच जि.प.शाळेच्या परीसराची स्वच्छता केली तसेच जि.प.प्राथमिक शाळा नं २ च्या परिसरामध्ये कडुनींब, पिंपळ, वड, करंज आदी देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मयुरेश्वर प्रतिष्ठानचे महेश चांदगुडे यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली.
ग्रामस्थांनी देखिल आपला परिसर स्वच्छ ठेवुन तसेच प्लास्टिकचा कमीत कमी वापर करुन झाडे लावुन पर्यावरण संवर्धनाचे काम करण्यात यावे असे आवाहन येथील सरपंच तुषार हिरवे यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच शंकर शेंडगे, सदस्य विशाल चांदगुडे, नयना जगताप, शफीक बागवान, ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सुभाष चांदगुडे, अशोक लोणकर, अर्जुना सायन्स अकॅडमीचे शिक्षक, मयुरेश्वर प्रतिष्ठानचे महेश चांदगुडे, जेष्ठ नागरीक संघ, मयुरेश्वर अभयारण्य, आरोग्य विभागाचे डाॅ.खडसे व आशा सेविका, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, जि. प. शाळेचे शिक्षक, आसीफ कोतवाल आदींनी सहभाग घेतला होता.
............................................