सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गुजरात-अहमदाबादमधील मेघाणीनगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. ही घटना दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी घडली.
अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले. स्थानिक नागरिकांनीही याला दुजोरा दिला आहे. विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार हे एक प्रवासी विमान होते.