Purandar Breaking l दोन चारचाकींची धडक..! आठ जणांचा जागीच मृत्यू : पुरंदर तालुक्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : विनोद पवार
जेजुरी ता. पुरंदर नजीक इंडियन सिमलेस येथे असलेल्या श्रीराम हॉटेल जवळ झालेल्या अपघातात आठ लोकांचा जागीच मृत्यू झाल्या असल्याची माहिती समजत आहे. हॉटेल साठी आणलेले साहित्य व फ्रिज सायंकाळी साडेसातच्या दरम्यान खाली होते याच दरम्यान स्वीफ्ट गाडीने जोरदार ठोस दिल्याने हा भीषण अपघात झाला.
        मोरगाव - जेजुरी या रस्त्यावर इंडियन सिमलेस नजीक हॉटेल श्रीराम हे आहे.या हॉटेल साठी आणलेल्या फ्रिज खाली करण्यासाठी हॉटेल च्या मुख्य द्वाराच्या बाजूला रिव्हर्सने पिकअप गाडी क्रमांक एम एच 12 एक्स एम 36 94 लावली होती. याच दरम्यान भरधाव स्वीफ्ट गाडी क्रमांक एम एच 42 ए एक्स 1060  जेजुरी वरून मोरगावच्या दिशेने आली असता तिने धडक जोरदार दिली. यामध्ये आठ लोक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्विफ्ट ने जोरदार ठोस दिल्याने पिकप पलटी झाल्याने पिकपच्या शेजारी उभी राहिलेली काही लोक पिकप खाली आल्याने मृत्युमुखी पडल्याची संख्या 8 झाली आहे. यामध्ये स्विफ्ट गाडीतील महिला, लहान मुलं , असून या हॉटेलचा मालक वायसे हे सुद्धा या अपघातात मृत्यू झाले असल्याची  प्राथमिक माहिती मिळत आहे.
To Top