Velhe News l मिनल कांबळे l रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले राजगड व किल्ले तोरणावरून जल रवाना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
रायगडावर  होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले राजगड व किल्ले तोरणा या दोन्ही ऐतिहासिक राजगड तालुक्यातील किल्ल्यांवरील जल हे कलशांमध्ये भरून होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मावळा जवान संघटनेच्या माध्यमातून  किल्ले रायगड वर घेऊन जाण घेऊन जाणार आहे या जल कलशाचे पूजन वेल्हे पंचायत समिती आवारातील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर वेल्ह्याचे उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र साहेब वेल्ह्याचे पोलीस निरीक्षक अमित देशमुख नायब तहसीलदार मयूर बनसोडे यांच्या हस्ते या कलशाच पूजन करण्यात आले. 
                     पंधरा वर्षे मावळा जवान संघटनेच्या माध्यमातून या दोन ऐतिहासिक किल्ल्यांवरील जल हे राज्याभिषेक सोहळ्यासाठी विनोद दिघे व त्यांचे सर्व सहकारी घेऊन जात असतात या कार्यक्रम प्रसंगी  लाला रेणुसे, वेल्ह्याचे सरपंच नंदकुमार खुळे,  उपसरपंच प्रमोद पवार , उद्योजक राजू पांगारे, उद्योजक उमेश महाडिक, उद्योजक प्रमोद भोरेकर, उद्योजक रामदास दिघे, भाजपा जिल्हा पदाधिकारी शुभम बेलदरे, उपसरपंच रुपेश पवार, विनोद गायकवाड, सुहास पवार, प्रमोद गायखे, विष्णू  जेधे, अंकुश वेग्रे, ऋषिकेश जाधव, रुद्र भुरुक,अजित पिलावरे,संतोष खुळे,रामभाऊ राजीवडे,बापूसाहेब साबळे,वेल्हे पोलीस स्टेशन चे ज्ञानेश्वर धिवार, आकाश पाटील उपस्थित होते. 
       मावळा जवान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजक रोहीत नलावडे व विनोद दिघे, शुभम सोनवने,वेदांत जेधे,नितीन राजीवडे,यश दिघे,अजित पवार,अर्णव दिघे यांच्या हस्ते कलश रायगडाकडे रवाना करण्यात आला.


To Top