सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मानाची व प्रतिष्ठेची असलेली विंझर ग्रामपंचायत सरपंचपदी मनसेच्या सविता मोहन दसवडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी पंचायत समिती सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष दसवडकर यांनी सरपंच सविता मोहन दसवडकर यांचे अभिनंदन केले.
राजगड तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत विंझर असून येथील विकास कामासाठी कायमच अग्रेसर असते. नुकतेच लोकमत सरपंच अवॉर्ड मावळत्या सरपंच मोनाली सतीश लिम्हण यांना मिळाला आहे. सरपंच मोनाली लिम्हण यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. नवीन सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत परंपरेनुसार सरपंच म्हणून मनसेच्या सविता मोहन दसवडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विंझर मधील विठ्ठल वाडीला 59 वर्षानंतर सरपंच पद मिळाले आहे मंडळ अधिकारी राजपाल यादव यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, मावळत्या सरपंच मोनाली लिम्हण, सतीश लिम्हण, विनायक लिम्हण, मोहन दसवडकर, उपसरपंच नूतन गायकवाड, सदस्य अमोल गायकवाड, राहुल सागर, ग्रामसेवक अजित बनसोडे किरण भोसले, सुप्रिया दसवडकर, अंकुश दसवडकर, चंद्रकांत चव्हाण, विक्रम जगताप, काळुराम जगताप, समीर दसवडकर, स्वप्निल दसवडकर, योगेश दसवडकर, पैलवान संग्राम दसवडकर पृथ्वीराज दसवडकर आधी सह ग्रामस्थ उपस्थित होते
-----------------
विंझर येथील समाज शिक्षण मंडळ, तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, तसेच गावातील विविध विकास कामासाठी नेमलेल्या समित्या सर्वांचीच निवड ही बिनविरोध केली जात आहे. ही परंपरा कायम राखत सरपंच पदाचे देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
-----------------------
ग्रामीण पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, आरोग्य, स्वच्छता, सुशोभिकरणं, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, शिक्षण, नवोपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सविता दसवडकर यांनी सांगितले.