Bhor News l पत्रकारीता क्षेत्रातील राजा माणूस हरपला : ज्येष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
भोर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक,माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार भुजंगराव(आबा) दाभाडे (वय ७१) रा.भोलावडे यांचे सोमवार दि.१४ वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यामागे पत्नी,दोन मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार असून भुजंगराव दाभाडे हे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे खंदे समर्थक होते.
     भुजंगराव दाभाडे यांनी वर्ष विविध वर्तमानपत्रांमध्ये काम करून अन्यायाविरुद्ध पत्रकारितेत निर्भीडपणे लढा देत समाजाला योग्य न्याय देण्याचे काम केले.तर राज्यात त्यांचा आदर्श पत्रकार म्हणून नावलौकिक होता. 
Tags
To Top