Bhor Breaking l घराचे बांधकाम सुरू असताना विजेच्या धक्क्याने गवंड्याचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहराशेजारील उत्रोली येथे घराचे बांधकाम सुरू असताना हातातील लोखंडी सळई वीज वाहकतारांना चिकटल्याने बांधकाम कामगाराला जोरदार विजेचा धक्का लागला.या घटनेत कांतीलाल दिगंबर धोत्रे रा.उत्रोली ता.भोर( वय ४०) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.१० घडली.
       स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कांतीलाल धोत्रे गावातच आरसीसी घराचे बांधकाम सुरू असलेल्या एका घरावर गवंडी कामगार म्हणून काम करत होते.काम करीत असताना अचानक हातातील लोखंडी सळई शेजारून गेलेल्या वीज वाहकतारांना चिकटली.यात कांतीलाल यांना जोरदार विजेचा धक्का बसला.यावेळी ते तिसऱ्या मजल्यावरून जमिनीवर फेकले गेले.दरम्यान गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.कांतीलाल धोत्रे यांची दुर्दैवी घटना घडल्याने उत्रोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.भोर पोलिसात या घटनेची खबर देण्यात आली असून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


To Top