Bhor News l शालेय जीवनात कलागुणांना वाव द्या..भविष्य घडेल : 'राजगड'चे संचालक उत्तम थोपटे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच खेळ तसेच कला जोपासणे फार महत्त्वाचे आहे. शालेय जीवनातून पुढे जाताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी सुप्त कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे.गुणवत्ता पूर्व व दर्जाहीन शिक्षण घेऊन पुढे जाण्यासाठी तसेच भविष्य घडविण्यासाठी कलागुणांना वाव द्या असे मत राजगड साखर कारखाना संचालक उत्तम थोपटे यांनी व्यक्त केले.
      भोर येथे राजगड ज्ञानपीठ संचलित जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भोर यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन तसेच रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी संचालक थोपटे शुक्रवार दि.९ बोलत होते.ज्ञानपीठच्या सचिवा स्वरूपा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमात शेकडो चिमुकल्यांसह कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून पालक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यावेळी उन्नती प्रतिष्ठान अध्यक्ष सीमा तनपुरे,केंद्र समन्वयक मनोज पुरंदरे,प्रमोद कुलकर्णी,नगरसेवक तौसिफ आतार,बजरंग शिंदे,प्राचार्य रूबेना सय्यद,स्वाती मोटकर,पत्रकार विजय जाधव,अर्जुन खोपडे,संतोष म्हस्के,दीपक येडवे,उपशिक्षक सतीश थोपटे यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.थोपटे पुढे बोलताना म्हणाले लहान वयातच शालेय जीवनात विद्यार्थी,विद्यार्थिनींना सांघिक तसेच खेळांची आवड होणे महत्त्वाचे असते.आवडीनुसार विद्यार्थ्यांनी स्वतःचे कलागुण जोपासले तर भविष्यकाळात पुढे जाण्यासाठी त्याचा फार मोठा फायदा होत असतो.जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल गेले पंचवीस वर्षांपासून गुणवत्ता पूर्व तसेच दर्जाहीन शिक्षण देत आले आहे.विद्यालयातील शिक्षक वृंद उच्चशिक्षित असल्याने विद्यार्थी घडवण्याची त्यांची धडपड असून पुढील काळात अशाच प्रकारे शिक्षण मिळत राहील.विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे तरच भविष्य घडेल.
      
To Top