सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
माणसाने समाजात वावरताना शरीरा बरोबर मनालाही शिस्त लावण्याची गरज आहे. आपण बोलताना शब्द हे शस्त्र आहे याचे भान असावे. माणूस स्वतः बदलला तर जग आपोआप बदलेल. तरच माणसाला मानवी जिवनाचे महत्व समजेल असे मत माजी आमदार ॲड. रामहरी रूपनवर पाटील यांनी व्यक्त केले.
सुपे (ता. बारामती ) येथील जीवन साधना फाउंडेशन आयोजित प्राजक्ता' व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ' मानवी जीवनाचे महत्व ' या विषयावर रूपनवर बोलत होते. यावेळी त्यांनी आरोग्य, अध्यात्म तसेच सामाजिक विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते वैभव जगताप होते. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अरुण सकट, उद्योजक गणेश जोजारे, काऱ्हाटी येथील यशवंत प्रेरणा ट्रस्टचे चांदगुडे, सुरेश डफळ, परशुराम वाकळे, अमित कुतवळ, अरुण कुतवळ आदी उपस्थित होते. यावेळी वैभव जगताप यांच्या माध्यमातून मतिमंद विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जेष्ठ सदस्य अशोक बसाळे यांनी केले. व्याख्याता परिचय संस्थेचे व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी केला. तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे यांनी मानले.
..................................
