Jawali News l सोमनाथ साखरे l जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला तरुणाचा बळी : सातारा-मेढा रस्त्यावर रुग्णवाहिकेच्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
सातारा मेढा रस्त्यावर केसकरवाडी जवळ  रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला असून दुसऱ्यावर सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुचाकी स्वार उलट बाजूने आल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास झाला.
           याबाबत पोलिसांकडून मिलालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर नगरपालिकेची रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन सातारा येथे निघाली असता केसकरवाडी जवळ रुग्णवाहिका आली त्यावेळी सातारा बाजूकडून मेढ्याकडे जाणारे दुचाकी रस्त्याच्या उलट दिशेने आल्याने भरधाव रुग्णवाहिकेने त्यांना धडक दिली. त्यावेळी दुचाकी वरील अनिल विष्णू धनावडे मूळ राहणार तापोळा हल्ली राहणार बैल बाजार, मेढा वय २७ हा जागीच ठार झाला. अनिल हा तेथे एका शोरूम मध्ये काम करत होता तर दुचाकी वर पाठीमागे बसलेला अभिजीत संजय जाधव राहणार गांजे हा जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे तर रुग्णवाहिकेतील रुग्णालाही दुसऱ्या वाहनाने उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले. मयत अनिले शिववेच्छान मेढा येथिल ग्रामीण रुग्नालयात रात्री उशिरा पर्यत सुरु होते.

To Top