सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
कुडाळ रस्त्यावरील अलेवाडी घाट परिसरात आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मेढ्याकडे येणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट शंभर फूट खोल दरीत कोसळले. मात्र, दरीत असलेल्या उंबराच्या झाडाला वाहन अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून वाहनातील चालक व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्राण वाचले.
सध्या पाचवड–चिपळूण रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सूचना फलकांचा अभाव, धुळीवर नियंत्रणासाठी पाणी न मारणे तसेच रस्त्याची खडबडीत अवस्था यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी अरुंद रस्ता व धोकादायक वळणे असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
दरम्यान, आज दुपारी मेढ्याकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने मानकुमरे पाईंच्या खालील उतारावरील तीव्र वळण घेत असताना अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वाहन रस्त्याबाहेर घसरत थेट शंभर फूट खोल दरीत कोसळले. सुदैवाने दरीत असलेल्या उंबराच्या मोठ्या झाडाला वाहन अडकल्याने ते आणखी खाली जाण्यापासून वाचले.
अपघाताची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दुपारची वेळ असल्याने मदत लवकर मिळाली. स्थानिकांच्या मदतीने वाहनातील चालक व त्यांचे सहकारी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातात दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघात होऊ नयेत यासाठी संबंधित विभागाने तात
