Bhor News l रामबाग रोडवर चोरट्यांचा धुमाकूळ : दुकान फोडून व घराचा दरवाजा तोडून सुमारे ३ लाखांची रोकड लंपास

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील चौपाटी रामबाग रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी दुकाने व घर फोडून मोठी चोरी केल्याची घटना गुरुवार दि. २९ च्या रात्री घडली. या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद यशवंत डाळ यांनी दिली आहे.
        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौपाटी रामबाग रोडवरील विलास ट्रेडर्स व माऊली सर्विसेस या दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. याचबरोबर यशवंत डाळ यांच्या बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप फोडून दुकान व घरातील रोख रक्कम लंपास केली. या चोरीत डाळ यांचे सुमारे २ लाख ८५ हजार रुपये तर याच मार्गावरील बाजीराव खोपडे यांच्या दुकानातून ४ हजार ५०० रुपये अशी एकूण २ लाख ८९ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार यशवंत शिंदे व पोलीस हवालदार धर्मवीर खांडे करीत आहेत.
दरम्यान, भोर शहरात एकाच रात्री झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.
Tags
To Top