सुपे परगणा l सुपेकरांच्या वतीने अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना बारामती तालुक्यातील सुपे तसेच परगण्यातील ग्रामस्थाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
        येथील सुपे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून बसस्थानक आवारात अजित पवार यांच्या फोटोला हार घालून सुपे परगण्याच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. येथील सरपंच तुषार हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
        बुधवारी ( दि. २८ ) रोजी सकाळी विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्या निधनाने बारामतीसह संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारच्या वतीने तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
          यावेळी राजकारण हे होतच राहील. मात्र या भागाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका अजितदादा यांची होती. त्यांचा विकासाचा वारासा पुढे नेहल्यास तीच खरी श्रद्धांजली ठरेल असे पुणे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी सांगितले. 
        याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, सरपंच तुषार हिरवे, दिलीप खैरे, पोपट खैरे, ज्ञानेश्वर कौले, बी. के. हिरवे, डॉ. श्रीप्रसाद वाबळे, संपत जगताप, राजेंद्र शर्मा, महेश चांदगुडे, नवनाथ चांदगुडे, पोपट चिपाडे, वाल्मिक खैरे, पोपट पानसरे, आंबी खुर्दचे सरपंच कुतवळ, संजय दरेकर, निलेश लडकत, सुशांत जगताप, अशोक बसाळे, नाना कदम, शंकरराव चांदगुडे, भीमा वाघचौरे, मयुरी लोणकर, पल्लवी खेत्रे, विजय खैरे, रमेश बोरकर, संतोष काटे, महादेव भोंडवे, मनीषा चांदगुडे, विठ्ठल खैरे, सुरेश फडतरे, भानुदास बोरकर, बाळासाहेब गोसावी, भीमराव जगताप, सुयश जगताप, शौकत कोतवाल, सचिन लडकत, माऊली चव्हाण आदीच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पसायदान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चांदगुडे यांनी केले.
         ........................................
To Top