सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला एकदिवसीय 'विद्यार्थी परिसंवाद' अत्यंत उत्साहात पार पडला. या परिसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावविकास, सुरक्षा आणि आधुनिक भारताचे स्वप्न यांसारख्या विविध विषयांवर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सुर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून दैनिक लोकमतचे वार्ताहर महेश जगताप, आणि दैनिक पुढारीचे वार्ताहर युवराज खोमणे उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. धनंजय बनसोडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमासाठी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मा. मिलिंद कांबळे, संचालक प्रतिनिधी मा. आनंदकुमार होळकर व संस्थेचे सचिव मा. भारत खोमणे यांनी शुभेच्छा दिल्या. परिसंवादाचे स्वरूप आणि विषय या परिसंवादात एकूण १७ गटांतील १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी खालील महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरणे व अभ्यासपूर्ण मते मांडली.
• शाश्वत विकास आणि विकासाचा मध्यबिंदू.
• माझा परिसर आणि माझे गाव — विकासाचे मॉडेल.
• महिला व युवती सुरक्षेमधील माझी भूमिका आणि जबाबदारी.
• ‘विकसित भारत’ माझे स्वप्न — माझा आराखडा.
• माझ्या करिअरची ब्ल्यू प्रिंट आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विचारांची प्रगल्भ देवाणघेवाण हे या परिसंवादाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे मत उपप्राचार्य प्रा. बनसोडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल श्री. अजित जगताप यांनी नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. परीक्षकांना प्रा. राजश्री शेळके, प्रा. शुभांगी कांबळे, प्रा. माधुरी भांडवलकर, प्रा. जयश्री भोसले, प्रा. सुनिता घाडगे, प्रा. प्राजक्ता अडसूळ, प्रा. दीप्ती भोईटे आणि प्रा. रेश्मा शिंदे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष पिंगळे यांनी केले, सूत्रसंचालन सहा. प्रा. माधुरी भांडवलकर यांनी केले, तर सहा. प्रा. वैष्णवी ननावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
