Bhor News l हिर्डोशी विद्यालयाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ निकाली : 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या वृत्ताने शाळा व्यवस्थापन, प्रशासन खडबडून जागे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
दुर्गम डोंगरी हिर्डोशी ता.भोर येथील शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने पाणी वाहतूक करण्यास लावली होती.
               याचे हिरडोशी विद्यालयात शिक्षणाचे नव्हे तर पाणी भरण्याचे धडे असे सोमेश्वर रिपोर्टरने वृत्त प्रसिद्ध केले होते.तात्काळ शाळा प्रशासन तसेच व्यवस्थापन खडबडून जागे होऊन दोन तासात शाळेचा नळ पाणीपुरवठा नादुरुस्त झालेला दुरुस्त करून शाळेच्या प्रांगणात पाणी पोहोचले. या संदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती भोर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित ग्रामसेवक यांना तातडीने घटनास्थळी भेट देऊन शाळेतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

ग्रामसेवक अनिल अभंग यांनी सरपंच यांच्या उपस्थितीत शाळेस भेट देऊन पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला असून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याचा प्रश्न मिटला.
Tags
To Top