सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रातील केंद्रबिंदू असणाऱ्या व विकासात्मकदृष्टीने शिरवळचा कायापालट करण्याच्या उद्देशाने शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर यांच्या संकल्पनेतून व एसीजी केअर्स फाऊंडेशनने दिलेल्या पाठबळामुळे रोल मॉडेल ठरलेल्या शिरवळ समृद्धी`एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरेल.
सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक प्रकल्प उभारत शिरवळ हि सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असून सातारा जिल्ह्याचा नावलौकिक सातासमुद्रापार नेण्यात शिरवळ समृद्धी प्रकल्पाचा सिहांचा वाटा आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
शिरवळ ता.खंडाळा येथे एसीजी ग्रुप,एसीजी केअर्स फाऊंडेशन,सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन,शिरवळ ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून व सृष्टी वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या `शिरवळ समृद्धी`एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी एसीजी ग्रुपचे अध्यक्ष अजित सिंग,सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद,वाई प्रांताधिकारी डॉ.योगेश खरमाटे,एसीजी केअर्स फाऊंडेशन संचालक सुनील झा,एसीजी गृप सीएसआर प्रमुख सुनील कुमार,सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे वरिष्ठ प्रकल्प संचालक प्रभजोत सोढी,फार्मापॅकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.आर.शिवशंकर,सृष्टी वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे श्रीगोपाल जगताप,नूतन जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले,खंडाळा पंचायत समिती सदस्य छाया जाधव,खंडाळा पंचायत माजी सभापती राजेंद्र तांबे,गुरुदेव बरदाडे,माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती बरदाडे,शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर,उपसरपंच अमोल कबुले,ग्रामपंचायत सदस्य राहुल तांबे,रोहित जाधव,पुजा मगर,रुपाली गिरे,सुरेखा हाडके,सोनाली देशमुख,शोभा गायकवाड,मोहिनी गायकवाड,तृप्ती देशमुख,संग्राम देशमुख,दिपाली बोडरे,गटविकास अधिकारी अनिल वाघमारे,ग्रामपंचायत अधिकारी बबनराव धायगुडे,एसीजी केअर्स फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रशेखर वाळके,भाजप शहराध्यक्ष राजेंद्र मगर,माजी उपसरपंच दिलीप गुंजवटे आदी उपस्थित होते.
अजित सिंग म्हणाले,एसीजी ग्रुप सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे.निस्वार्थ सेवा,माणुसकीतून मदतीचा हात,पर्यावरण रक्षण आणि सामाजिक कार्याच्या प्रेरणेसाठी `शिरवळ समृद्धी`एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा आदर्श ठरणार असून समाजजीवन समृद्ध करण्यासाठी एसीजी ग्रुप महत्वाची भूमिका निभावेल.शिरवळ व पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी एसीजी ग्रुप भविष्यामध्ये अनेक उपक्रम राबविणार आहे.यावेळी याशनी नागराजन,रविराज दुधगावकर,अमोल कबुले यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान शिरवळ समृद्धी एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे लोकार्पण एसीजी ग्रुप अध्यक्ष अजित सिंग,जिल्हाधिकारी संतोष पाटील,सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अजित सिंग यांचा शिरवळ ग्रामपंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील,याशनी नागराजन,उदय कबुले,राजेंद्र तांबे,रविराज दुधगावकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तर प्रकल्प उभारणीमध्ये महत्वाची भूमिका निभावलेल्या शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर तसेच विविध मान्यवरांचा सन्मान शिरवळ ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील,याशनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आला.रविराज दुधगावकर यांनी प्रास्ताविक,संतोष मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले तर राहुल तांबे यांनी आभार मानले.
चौकट-शिरवळच्या सांडपाणी प्रकल्पासाठी एसीजी ग्रुप सहकार्य करणार-अजित सिंग शिरवळ व एसीजी ग्रुपचे ऋणानुबंध जिव्हाळ्याचे असून शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर व त्यांचे सहकारी यांची विकासात्मक दृष्टी कौतुकास्पद असून एसीजी गृपच्या माध्यमातून शिरवळचा सर्वागीण विकास साधण्यासाठी आगामी काळात शिरवळला भेडसावणाऱ्या महत्वाच्या सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी एसीजी ग्रुप सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन एसीजी ग्रुपचे अध्यक्ष अजित सिंग यांनी केले.
