सुपे परगणा l अखेरचा हा दंडवत..! सुपे विद्यालयात अजितदादांच्या अस्थिरक्षा कलशाचे पूजन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी विद्यालयात दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या अस्थिरक्षा कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येथील विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांनी ' अखेरचा हा दंडवत ' असा भावपूर्ण निरोप दिला. 
        पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या अस्थिरक्षा दुपारी दीडच्या दरम्यान शहाजी विद्यालयात आणण्यात आल्या. यावेळी अस्थिरक्षा कलश दर्शनासाठी दुपारी खुला करण्यात आला. यावेळी विदयालयाचे विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेतर आदी मान्यवरांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी सामुदायिक पसायदान घेण्यात आले.
        यावेळी जिल्हा बँकेचे संचालक  संभाजी होळकर, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, अनिल जगताप, रतनसिंग खैरे, प्राचार्या एस. ए. लोणकर, दत्तात्रय कुतवळ, लालासाहेब नलवडे, शंकरराव चांदगुडे, शौकत कोतवाल, पोपट पानसरे, भरत खैरे, बी. के. हिरवे, ज्ञानेश्वर कौले, तुषार हिरवे, प्रमोद खेत्रे, अशोक लोणकर, सुशांत जगताप, संपत जगताप, पोपट खैरे, मनिषा चांदगुडे, राहुल भोंडवे, अशोक खैरे, प्रकाश काळखैरे, दत्तात्रय कदम, अभिजीत पानसरे, गणेश खैरे, यादव कुदळे, सचिन खैरे, सुपे परगण्यातील रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, सुपे व सुपे परगण्यातील सरपंच उपसरपंच, सदस्य व गामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
          ...................................
To Top