Rajgad News l राजगड तालुक्यातून 624 विद्यार्थी तोरणा विद्यालयात पेन व गुलाब देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
राजगड तालुक्यातून तीन केंद्रातून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 624 विद्यार्थी बसले असून तोरणा विद्यालय वेल्हे येथे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सीता खुळे व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांच्या हस्ते पेन व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात यावेळी ,खंडु गायकवाड अमर पवार,विकास कदम, उपस्थित होते,
                 सरस्वती विद्यालय आंबवणे येथे 327 विद्यार्थी परीक्षेत बसले असून केंद्र संचालक म्हणून अनिल गरड व केंद्र संचालक म्हणून एस के साळुंखे व संजय पगार यांनी काम पाहिले आहे तसेच वंजारी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे 149 विद्यार्थी परीक्षेत बसले असून केंद्र संचालक म्हणून भगवान बेल्हेकर व उपकेंद्र संचालक म्हणून अजित कोंढाळकर तसेच तोरणा विद्यालय वेल्हे येथे 148 विद्यार्थी परीक्षेत बसले असून केंद्रसंचालक संतोष चव्हाण हे काम पाहत आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जेष्ठ शिक्षक तानाजी सागळे , बोर्डाचे बैठक पथकातील श्री जाधव माजी सर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

तोरणा विद्यालय वेल्हे (ता. राजगड) येथील विद्यार्थ्यांचे गुलाब व पेन देऊन स्वागत करताना नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सीता खुळे व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने उपस्थित
To Top