Baramati News l सोमेश्वर सायन्स कॉलेजमध्ये ‘स्टार्टअप टॉक सिरीज’ उत्साहात; १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर सायन्स कॉलेजमध्ये १७ व १८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘स्टार्टअप टॉक सिरीज’ या विशेष उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइझ' (CIIE) च्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
           कार्यक्रमाची सुरुवात 'वृक्ष संजीवनी' या पर्यावरणपूरक उपक्रमाने आणि विद्यापीठ गीताने करण्यात आली. उद्योजकीय प्रवासाचे मार्गदर्शन दोन दिवस चाललेल्या या टॉक सिरीजमध्ये अनुभवी उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले निखिल गायकवाड (संस्थापक, नेक्सा ग्रुप): १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी ई-वाहन (E-Vehicle) स्टार्टअपच्या प्रवासावर प्रकाश टाकला. स्टार्टअप सुरू करताना येणारी आव्हाने, निधी उभारणी (Funding) आणि शाश्वत विकासाचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. सौ. प्रणिता गायकवाड (संचालक, सिगोफूड लॅब): १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी ‘फूड टेस्टिंग लॅब’ मधील संधी आणि आव्हाने यावर मार्गदर्शन केले. गुणवत्ता निकष, शासकीय नियमावली आणि प्रयोगशील शिक्षणातून स्टार्टअप कसा उभा करावा, याचे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. या उपक्रमात १०० हून अधिक विद्यार्थी, विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. प्रत्येक सत्राच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर तासात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची ओढ निर्माण होते आणि त्यांना प्रत्यक्ष बाजारातील परिस्थिती समजण्यास मदत होते. — प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन 'इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि स्टार्टअप सेल'च्या समन्वयक प्रा. माधुरी भांडवलकर यांनी केले. त्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमासाठी संस्थेचे व सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम दादा जगताप, उपाध्यक्ष श्री. मिलिंद कांबळे, संचालक प्रतिनिधी श्री. आनंदकुमार होळकर, संस्थेचे सचिव श्री. भारत खोमणे आणि सर्व संचालक मंडळाने विशेष शुभेच्छा दिल्या.
To Top