सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
शिवजयंती निमित्त वेल्हे तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर सदस्या सीता खुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, गट विकास अधिकारी संजय ढमाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेल्हे मुख्याध्यापक भरत शेंडकर किरण कांबळे, ड्रीमलँड इंग्लिश स्कूल मालवली च्या मुख्याध्यापिका तृप्ती शिळीमकर, माजी सरपंच संतोष मोरे, नथू गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, माजी सरपंच विनायक लिम्हण सुनील राजीवडे, राणी दिघे, हर्षदा देशपांडे, चंद्रकांत चव्हाण रविंद्र करंजकर,आदिसह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वेल्हे येथील विद्यार्थ्यांनि विविध गाणी सादर केली तर इंग्लिश स्कूल मधील ज्ञानेश्वर भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला, ड्रीमलँड इंग्लिश स्कूल मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, येथील पंचायत समिती समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्व रूढ पुतळ्यास विश्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष दसवडकर व संचालिका सुप्रिया दसवडकर प्राचार्य तृप्ती शिळीमकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर वेल्हे पासून ते मालवली पर्यंत विद्यार्थ्यांनी शिवज्योत आणली, विद्यार्थ्यांनी शिवज्योतीचे स्वागत करून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा अगोदर मोगलांनी केलेला छळ, अफजलखानाचा वध, रायरेश्वरावरील छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली शपथ, व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी नृत्य करून गाणी सादर केले, मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी अध्यक्ष संतोष दसवडकर, संचालिका सुप्रिया दसवडकर, प्राचार्या तृप्ती शिळीमकर, स्वाती निगडे, राणी दिघे, हर्षदा देशपांडे, रेश्मा कांबळे, मिनल रणखांबे, श्रेया पडवळ, ऋतुजा दसवडकर, नम्रता भगत, सानिका शिंदे, शुभम सरपाले, प्रणिता कोतवाड, रिचा जामदार, अभिलाषा गायकवाड आदीसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
