Jawali News l वेण्णा नदी पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा बुडून मृत्यु

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
जावली : सोमनाथ साखरे
काल ( दि. १७ रोजी ) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेढा येथील वेण्णा नदीपात्रात मेढा मोहाट पुलाचे ठिकाणी एक जण पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्युमुखी पडला असल्याची घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.
             असून मृत व्यक्तीचे नाव शेषराव साहेबराव चव्हाण वय 40, रा. देगाव, ता. शेलू, जि. वर्धा असे आहे. शेषराव चव्हाण यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पोहताना पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याने आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक व महाबळेश्वर येथिल सह्याद्री ट्रेकर्स यांच्या सहाय्याने या व्यक्तीचा शोध घेतला असता आज ( दि.१८ ) दुपारी एकच्या सुमारास पाण्यातुन बाहेर काढण्यात येवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्नालय मेढा येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेची अकस्मात मयत म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.ना. धीरज बेसके हे करीत आहेत.
To Top