सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत गुंजवणे गावाची प्रशासनाकडून नुकतीच पाहणी करण्यात आली.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत गुंजवणे गाव तालुक्यामध्ये गुणांकन टक्केवारी मध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे कमी असलेल्या बाबी लक्षात घेऊन त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
शाळेतील शिक्षकांनी राज्यस्तरीय व विभागस्तरीय स्पर्धेत यश मिळवले ग्रामसेवक संदेश यादव यांनी चांगले काम केल्यामुळे त्यांचा मान्यवरांकडून सन्मान करण्यात आला राजगड तालुका दुधसंघ अध्यक्ष अर्जुन भिलारे यांनी शाळेसाठी पाच हजार रुपयाची पुस्तके खरेदी करण्यासाठी मदत केली.
या. प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे अमोल नलावडे पंचायत समिती सदस्या सीता खुळे, संदीप खुटवड यांचा गावच्या वतीने व शाळेच्या वतीने समाज सुधारकांची वाचनीय पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.त्याबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी आनंद बांदल साहेब तसेच विस्तार अधिकारी शकील मुल्ला, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, मुख्याध्यापक हेमंत कांबळे, सरपंच गुलाब रसाळ पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ, आदीसह अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
