Rajgad News l विंझरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यात विंझर येथे इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब व पेन देऊन करण्यात आले. 

केंद्रसंचालक भगवान बेल्हेकर, उपकेंद्र संचालक तानाजी सांगळे, सहाय्यक परिरक्षक रामदास पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष लक्ष्मण भोसले सरपंच सविता दसवडकर, योगेश लिम्हण, मोहन दसवडकर, केंद्रप्रमुख बाळासाहेब शेख, आनंदराव बांदल स्वामी समर्थ प्रतिष्ठान चे संतोष कदम, गणेश चाळेकर, गणेश भोसले, प्राध्यापिका जयश्री रासकर, शिक्षक वसंत कराड, दीपक कुवर नरेंद्र गावित, संजय सानप, संजय चौधरी, दिलीप राठोड उपस्थित होते. राजगड तालुक्यातून एकूण 422 विद्यार्थी 12 वीच्या परीक्षेस बसले असून सरस्वती विद्यालय आंबवणे येथे एकूण 167 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.तर केंद्र संचालक अनिल गरड व उपकेंद्र संचालक महादेव पापळ हे काम पाहत आहेत. तर न्यू इंग्लिश स्कूल विंझर येथे एकूण 255 विद्यार्थी परीक्षेला बसले असून केंद्र संचालक भगवान बेल्हेकर व उपकेंद्र संचालक तानाजी सांगळे काम पाहत आहेत.
To Top