Supe News l सुपे येथे रमजान ईद साधेपणाने साजरी करणार स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

सोमेश्वर रिपोर्टर live

सुपे l सचिन पवार
 समस्त मुस्लिम समाज सुपे यांच्या वतीने यंदाची रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
            समस्त मुस्लिम समाज सुपे यांच्या पत्राद्वारे बारामती तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे यांना याबाबत कळविण्यात आले आहे. मुस्लिम समाजातर्फे ईद निमित्त कोणताही जल्लोष अथवा उत्सव न करता धार्मिक विधीपुरतीच ईद साजरी करण्यात येणार आहे. मशिद व दर्गा येथे विशेष नमाज पठण करून स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पवार कुटुंबीयांवर आलेल्या दुःखात मुस्लिम समाज सहभागी असून, आनंदोत्सव टाळून साध्या पद्धतीने ईद साजरी करणे हीच खरी आदरांजली ठरेल, अशी भावना समस्त मुस्लिम समाज सुपे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
Tags
To Top