Baramati News l बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी युवराज खोमणे, कार्याध्यक्षपदी राजेश वाघ तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी महेश जगताप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे युवराज खोमणे, जेष्ठ पत्रकार कार्याध्यक्ष राजेश वाघ, उपाध्यक्षपदी सकाळचे कल्याण पाचांगणे, नवराष्ट्रचे  सुनील जाधव, सचिव पुढारीचे गजानन हगवणे, सहसचिव सकाळचे चिंतामणी क्षीरसागर, खजिनदार विजय गोलांडे तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष लोकमतचे महेश जगताप यांची निवड करण्यात आली. तसेच माणिकराव डांगडे पाटील, दत्ता माळशिकारे व जयराम सुपेकर यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली. 
मोरगाव ता. बारामती येथे निसर्ग संगीत याठिकाणी दि. २७ रोजी पत्रकार संघाच्या मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे होते. पत्रकार संघाचे मा. अध्यक्ष adv. गणेश आळंदीकर यांनी या निवडी जाहीर केल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, adv. गणेश आळंदीकर, रामभाऊ जगताप, संतोष शेंडकर, कल्याण पाचांगणे, दिपक जाधव, गजानन हगवणे, संगिता भापकर, विजय गोलांडे, विनोद पवार, चिंतामणी क्षीरसागर, सोमनाथ भिले, गोरख जाधव, सचिन पवार, मनोहर तावरे, सुनील जाधव, संतोष भोसले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते, तरडोली येथील सकाळच्या पत्रकार संगीता भापकर यांची कन्या अबोली हनुमंत भापकर हिने लेखापरीक्षक परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याने तिचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. 

तसेच राज्याचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पत्रकार संघाचे सदस्य विजय मोरे यांचे वडिलांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
To Top