सोमेश्वर रिपोर्टर टीम----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची आज बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संचालक मंडळाची महत्त्वाची सभा पार पडली.
अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे नावडकर यांनी जाहीर केले.नया सभेस उपाध्यक्षा संगिता कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, स्वप्निल जगताप, विजय तावरे, शिवराज जाधवराव, नितीन शेंडे, अविनाश देवकाते, रामदास आटोळे, दत्तात्रेय येळे, गणेश खलाटे, सतीश फाळके, प्रताप आटोळे, जयपाल देवकाते, ज्योती मुलमुले, रतनकुमार भोसले, राजेंद्र बुरुंगले, विलास देवकाते, देविदास गावडे, विशाल जगताप तसेच कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव, अविनाश गोफणे, विनायक गावडे, रविंद्र माने, संजय कोकरे, शिलाजी काळे, लालासाहेब माळशिकारे यांनीही उपस्थित राहून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, १ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आज पुन्हा बोलावण्यात आलेल्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. दिवंगत लोकनेते अजित दादांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. दरम्यान, सुनेत्रा पवार मागणी महिन्यात संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्ग मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून आल्या होत्या.
