Baramati News l कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांनी सक्षम होण्याचे ध्येय समोर ठेवून काम करावे -अशोक चव्हाण

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मोरगाव : प्रतिनिधी 
 प्रत्येक कुटुंबाच्या विकासासाठी महिलांची सर्वार्थाने सक्षमता आणि सकारात्मकता महत्त्वाची असून प्रत्येक महिलेने सक्षम होण्याचे ध्येय समोर ठेवून काम करावे प्रतिपादन पुणे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 
महाराष्ट्र सरकार महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्याकडून नव- तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत लोक संचलित साधन केंद्र कार्यकरिणी समिती सदस्य यांच्या करिता आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. तरडोली येथे दिनांक २३ व २४ मार्च २०२६ रोजी लोक संचलित साधन केंद्र प्रशासकीय ,आर्थिक व्यवस्थापन व्यवस्था,सनियंत्रण पद्धती याबाबतीत जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संपन्न झाले. महिला आर्थिक विकास महामंडळ,ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासा करिता काम करत असून पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यात एकूण २१०३ महिला स्वय सहाय्यता बचत गटाची स्थापना करण्यात आलेली आहे . सदरील गटात एकूण २५३४० महिला सदस्य आहेत महिलांच्या रोजगार निर्मिती करिता तसेच कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न वाढीसाठी नव- तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून २१ उप प्रकल्प स्थापन करण्यात आलेले आहेत प्रत्येक प्रकल्पात समान व्यवसाय करणाऱ्या कमीतकमी १५० महिला सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 
जिल्ह्यात महिलांच्या ८ स्वायत्त संस्था म्हणून लोक संचलित साधन केंद्राची जुन्नर ,आंबेगाव ,शिरूर ,भोर,
बारामती,इंदापूर व पुणे ,पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी कार्यरत आहेत . 

ग्रामीण भागात चिरकाल चालणाऱ्या महिलांच्या स्वयत्त संस्था उभा करणे हे ध्येय आहे त्याकरिता गावस्तरावर महिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करून बळकट करणे सर्व गटांची मिळून ग्राम संघ स्थापना करणे व तालुका स्तरावर महिलांच्या मजबूत संस्था म्हणून लोक संचालित साधन केंद्राची उभारणी करणे आणि स्थापन केलेल्या लोक संस्थाना बळकट करण्याकरिता प्रातिनिधिक सर्वसाधारण मंडळ व कार्यकारी समिती सदस्य यांना विविध प्रशिक्षण दिले जाते दिनांक २३ व २४ मार्च २०२६ रोजी एकूण ४५ सदस्यांना निवासी प्रशिक्षण देण्यात आले. मावीमचे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण, सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश भारती , जिल्हा कार्यक्रम सल्लागार आशिष दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यात आले.
  
तीर्थक्षेत्र मोरगाव जवळ तरडोली येथे निसर्ग संगीत ऍग्रो टुरिझम येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले. निसर्ग संगीत परिवाराकडून भारतीय संस्कृतीचे संवर्धन करत महिला सक्षमी करणाची दिशा देत त्यांना प्रजल्वित पणती बनवण्याचा उद्देश समोर ठेवून या प्रशिक्षणास उपस्थिती लावलेल्या महिलांना प्रशिक्षणाचा समारोप करताना महिलांची ओटी भरण्याचा उपक्रम राबविण्यात आला. 
 ग्रामीण भागातील माहेरी गेलेल्या मुलीला सासरी पाठवताना तिचा करण्यात आलेला सन्मानपूर्वक पाहुणचार महिलांचा करण्यात आला. दुर्मिळ होत चाललेल्या या संस्कृती चे संवर्धन आणि मिळालेला सन्मान यामुळे महिलांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद तरळला होता. 

ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या महिलांनी दिली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भारती यांनी केले तर उपस्थितांचे आभार आशिष दगडे यांनी मानले. 
To Top