सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, वाणेवाडी ग्रामस्थांनी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान देवाचे धार्मिक विधीचे कार्यक्रम हे साध्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
यंदाचा हनुमान जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार असून, मंदिरात केवळ धार्मिक पारायण आणि देवाची मिरवणूक काढली जाईल. लावणी, लोकनाट्य यांसारखे कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.
समाजोपयोगी उपक्रम म्हणून दि. २ रोजी रक्तदान शिबिर राबवून दादांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे.
या संदर्भात आयोजित बैठकीत सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सदस्य सुनील भोसले, पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले आणि हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ भोसले उपस्थित होते.
यावेळी सोमेश्वरचे माजी संचालक किशोर भोसले, राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, तालुका उपाध्यक्ष केतन भोसले, रामराजे सोसायटी माजी चेअरमन चंद्रशेखर जगताप, उत्तम भोसले, दूध संघाचे माजी चेअरमन पोपटराव भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य हेमंत शिंदे, बाबासाहेब भोसले, धन्यकुमार जगताप, कल्याण जगताप आणि तंटामुक्त अध्यक्ष तुषार शिंदे यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. याचवेळी अजितदादांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यासाठी 'साद संवाद' ग्रुपच्या वतीने दि. २ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज शिंदे यांनी केले. वाणेवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
