Baramati News l 'या' तारखेदरम्यान सोमेश्वर देवस्थानचा मुख्य गाभारा दर्शनासाठी राहणार बंद ; देवस्थान कमिटीचा निर्णय

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजे येथील श्री सोमेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या मासिक बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दि. २० मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील ठराव नुसार मंदिराचा मुख्य गाभारा शिवलिंगाला वज्रलेप तसेच स्वच्छता व देखभाल कामासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यानुसार, दि. २७ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत सुमारे ७ दिवस मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहील. या काळात भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र भाविकांना गाभाऱ्याच्या बाहेरून दर्शन मिळणार आहे. बैठकीस अध्यक्ष आनंद मोकाशी, सचिव विपुल भांडवलकर, खजिनदार सचिन भांडवलकर तसेच विश्वस्त रूपचंद भांडवलकर, मोहन भांडवलकर, प्रताप  भांडवलकर, प्रदीप भांडवलकर आणि अमोल भांडवलकर हे विश्वस्त उपस्थित होते.
To Top