Rajgad News l मार्गासनीत श्रीराम नवमी उत्साहात साजरी सप्ताहात पाळणा म्हणून महिलांनी जन्मोत्सव साजरा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील महिलांनी एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पाळणा गाऊन रामजन्मोत्सव साजरा केला,
यावेळी ह भ प मारुती महाराज वालगुडे यांनी श्रीराम यांच्या विषयी प्रवचन दिले. प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील विविध प्रसंग त्यांनी लोकांसमोर मांडले, गावातील सर्व महिला एकत्र येऊन प्रभू रामचंद्र यांचा जन्मसो मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी गावातील महिला युवक व वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 


To Top