Baramati News | अनुदान वेळेतच..! ऊसदरात 'सोमेश्वर'चा विक्रम कायम ठेवणार : अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आजअखेर ११,४४,५९२ मे. टन ऊसाचे यशस्वी गाळप केले आहे. सरासरी ११.८१ टक्के साखर उतारा राखत कारखान्याने आतापर्यंत १३,४३,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
               उत्पादनाचा वेगवान आलेख केवळ साखरच नव्हे, तर उपपदार्थांच्या निर्मितीतही कारखान्याने आघाडी घेतली आहे. अल्कोहोल उत्पादन: ५८,६०,५३३ लिटर. वीज विक्री: सहवीज निर्मिती प्रकल्पातून ६,४१,६७,४८० युनिट्सची महावितरणला विक्री. असे होणार ऊस दराचे वाटप (प्रति मे. टन) शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून संचालक मंडळाने पेमेंटचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
 पहिला हप्ता अनुदान एकूण देय रक्कम / दिनांक
१ ते १५ फेब्रुवारी ₹ ३३०० ₹ १०० वर्ग करण्यात आले आहे.
१६ ते २८ फेब्रुवारी ₹ ३३०० ₹ १०० १० मार्च रोजी वर्ग होणार.
मार्चमध्ये तुटणारा ऊस ₹ ३३०० ₹ २०० २५ मार्च व १० एप्रिल (हप्ता) आणि ७ दिवसात अनुदान. फेब्रुवारीनंतर उशिरा ऊस तोडणी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत अध्यक्ष जगताप यांनी मोठी घोषणा केली आहे. १६ फेब्रुवारीनंतर तुटलेल्या ऊसाचा खोडवा राखून तो पुढील हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याला पुरवल्यास, अशा शेतकऱ्यांना प्रति मे. टन १०० रुपये जादा अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

आपल्या सर्व सभासद, अधिकारी, कामगार आणि ऊसतोड मजुरांच्या सहकार्यामुळे चालू हंगाम मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात यशस्वीरित्या संपेल. कारखान्याकडे नोंद असलेल्या प्रत्येक टनाचा गाळप करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्पुरत्या फायद्यासाठी गुऱ्हाळांना किंवा बाहेरील कारखान्यांना ऊस न घालता, कारखान्याकडून मिळणारा दर आणि सवलतींचा विचार करावा.
     — श्री. पुरुषोत्तम जगताप (अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना)
To Top