Bhor News l भोरच्या बेरोजगारीचा तसेच सिंचनाचा प्रश्न प्रामुख्याने सोडवणार - माजी आमदार संग्राम थोपटे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
भोर : संतोष म्हस्के
 जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका जिंकलो,विकास कामे होणार,सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार.निवडणुकीमध्ये जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून लोकांच्या सर्वांगीण विकासासाचे स्वप्न पूर्ण होणार.परंतु भोर तालुक्याला खऱ्या अर्थाने बेरोजगारीचा भेडसवणारा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावणार असून सिंचनाखालील राहिलेल्या जमिनी बारमाही पाण्याखाली आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याचे मत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले. 
                 वीसगाव खोऱ्यातील आंबाडे ता.भोर येथे आंबाडेतील तरुण शिवाजी बाजीराव खोपडे यांची नवीमुंबई महानगरपालिकेत नगरसेवकपदी(विधी समिती सदस्य) निवड झाल्याबद्दल तसेच कारी-उत्रोली गटातील जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा संग्राम थोपटे,पंचायत समिती सदस्य सुषमा विक्रम चव्हाण,गीतांजली आंबवले यांच्या ग्रामस्थ मंडळ आयोजित नागरी सत्कार समारंभ प्रसंगी माजी आमदार थोपटे रविवार दि.१ बोलत होते.यावेळी जि.प.सदस्य पोपट सुके,मुंबई नगरसेवक पं.स.सदस्य माऊली पांगारे,प्रदीप खोपडे,सरपंच माधुरी खोपडे,प्रमिला खोपडे,अर्चना खोपडे,महेश खोपडे,ज्ञानेश्वर खोपडे,तुकाराम कानडे, प्रकाश बांदल,संभाजी खोपडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नगरसेवक शिवाजी खोपडे बोलताना म्हणाले कोणताही राजकीय वारसा नसताना समाजकारणाची आवड असल्याने समाज हितासाठी काम केले. 

तर मुंबईसारख्या शहरातील नागरिकांनी भोर तालुक्यातील आंबाडे गावच्या सुपुत्राला अनेक वर्ष समाज हिताचे काम केल्याने भरभरून मतदान रुपी आशीर्वाद देऊन निवडून दिले.पुढील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वनमंत्री गणेश नाईक तसेच माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत तसेच विसगाव खोऱ्यात नवनवीन समाज हिताचे उपक्रम राबवून जनतेच्या हिताची विकास कामे करण्याला प्राधान्य देणार आहे.
Tags
To Top