सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर - प्रतिनिधी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करीत पत्नीला घरात कोंडून ठेवून घरात डिझेल ओतून आग लावून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न पतीने केला.ही घटना पसुरे ता.भोर खोऱ्यातील कर्णवडी येथे शुक्रवार दि.२० रात्री घडली असून पत्नीने पतीच्या विरोधात भोर पोलिसात फिर्याद दाखल केली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पसुरे खोऱ्यातील कर्णवडी ता.भोर येथील एका कुटुंबातील व्यक्तीने शुक्रवार दि.२० रात्रीच्यावेळी पत्नी राहत्या घरात स्वयंपाक बनवून मुलाची वाट पाहत बसली होती.त्यावेळी पतीने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून घरामध्ये डिझेल ओतून घराला आग लावली.तर पत्नीला घरामध्ये कोंडून ठेवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.तसेच घराला आग लावलीने घराचे नुकसान झाले.भोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पतीला ताब्यात घेतले.तर उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक शीला खोत यांनी घटनास्थळाला भेट दिली.पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दीप्ती करपे करीत आहेत.
