Bhor News l भोलावडेच्या नीरामाता मंदिर परिसरात आढळला बेवारस मृतदेह

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 भोर पोलीस ठाणे हद्दीतील भोलावडे ता.भोर येथील निरा नदीच्या पात्राशेजारील निरामाता मंदीर परिसरात रविवार दि.२२ बेवारस अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला.याची खबर पोलिस पाटील मिलींद काळे यांनी भोर पोलिसात दिली.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अवस्थेत सापडलेल्या पुरुषाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्ष, उंची अंदाजे १६८ सेंमी,अंगावर फुल बाहयाचा पांढरा शर्ट, उजव्या हातात स्टिलचे कडे, दाडी व केस काळे पांढरे, कंबरेपासुन खाली कपडे नसलेले तर गळयात लोखंडी साखळी असे मयताचे वर्णन असून ही व्यक्ती कोनाच्या ओळखीचा किंवा पाहण्यामध्ये असल्यास भोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आण्णा पवार तपासी उपनिरीक्षक ए.एच.खुटवड यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन भोर पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
Tags
To Top