सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यात सोनवडी सुपे येथील प्रगतिशील शेतकरी गोरख साहेबराव मोरे (वय ७६) यांचे निधन झाले.
त्यांचा सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
खडकवासाला कालवा सल्लागार समितीचे सदस्य तसेच दैनिक 'सकाळ'चे उंडवडी (ता. बारामती) येथील बातमीदार विजय मोरे यांचे ते वडील होत.
